By  
on  

ऐश्वर्या राय बच्चन लवकरच हॉलिवूड सिनेमात झळकण्याची शक्यता

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री असं बिरुद मिरवणारी आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्याने एका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये आपलं स्वारस्य दाखवलं असून तिने त्या फिल्ममेकर्ससोबत प्राथमिक बातचितसुध्दा सुरु केली आहे.

मिडीया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या सध्या पेपरवर्क पाहत असून ती ह्यावर गांभीर्याने विचार करतेय, जर सर्व सुरळीत असेल तर लवकरच या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करण्यात येईल. तोपर्यंत चाहत्यांना मात्र वाट पाहावी लागेल. आत्तापर्यंत ऐश्वर्याने ऐकूण पाच हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. हे प्रोजेक्ट जर ठरलं तर तिचा तो सहावा हॉलिवूड सिनेमा असेल. या सिनेमांची नावं प्राईड अॅण्ड प्रेज्युडीज्, द मिस्ट्रेस ऑफ़ स्पाइसेस, द पिंक पॅंथर 2, द लास्ट लिजन आणि  प्रोवोक्ड आहेत.

सर्वांनाच आता ऐश्वर्याच्या हॉलिवूड पुनरागमनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive