By  
on  

तैमूरचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सवर भडकला सैफ अली खान,जाणून घ्या

सैफ आणि करिनाच्या स्टारडमपेक्षा सध्या तैमूरच त्यांच्या कुटुंबातला सर्वात मोठा स्टार आहे. तो जिथे जातो तिथे त्याच्यामागे फोटोग्राफर्सचा गराडा असतो. त्याच्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळेच हे पॅप्स तैमूरचे फोटो घेण्याचा मोह अजिबातच आवरु शकत नाहीत आणि चिमुकल्या तैमूरवर फ्लॅशचा वर्षाव करतात. नुकतंच या प्रसंगामुळे सैफ अली खान फोटोग्राफर्सवर प्रचंड भडकला.

मुंबई एअरपोर्टवर नुकताच एक प्रसंग घडला. तैमूरला फोटोग्राफर्सनी सैफ आणि करिनासोबत स्पॉट केलं आणि त्याच्यावर फ्लॅशचा वर्षाव सुरु केला. हे पाहून सैफ अली खानला प्रचंड राग आला आणि तो म्हणाला," बंद करा तुमचं हे,माझा मुलगा आंधळा होईल."

https://www.instagram.com/p/BwD9ghpjoGy/

यापूर्वीसुध्दा सैफ आणि करिनाने तैमूरच्या प्रसिध्दी वलयात राहण्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. फोटोग्राफर्सच्या अशा ट्रीटमेंटची तैमूरला आता बरीच सवय झालीय आणि त्यामुळेच त्याचं निरागस बालपण कुठेतरी हरवतंय असं म्हणत खंत व्यक्त केली होती. हे त्याचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत. त्यामुळे प्रसिध्दी माध्यमांनीसुध्दा आपलं भान जपलं पाहिजे.

https://www.instagram.com/p/BwCRZZkj9dX/

Recommended

PeepingMoon Exclusive