By  
on  

‘भारत’च्या सेटवरील कतरिनाचा हा लोभस फोटो पाहिलात का?

सध्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती सलमानचा आगामी सिनेमा ‘भारत’ची. भाईजानचा सिनेमा म्हणजे मनोरंजनाची १००% खात्री असल्याने चाहतेही त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पहात असतात. या सिनेमात पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही सिझलिंग जोडी एकत्र झळकतेय.

https://www.instagram.com/p/BwOfF95AZ2f/?utm_source=ig_web_copy_link

‘भारत’चा सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सेटवरून कतरिनाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कतरिना खुपच सुंदर दिसत आहे. तिने या फोटोत मेहंदी रंगाची साडी नेसली आहे. या फोटोला कॅप्शन देताना कतरिना म्हणते “#भारतचा ट्रेलर फक्त 10 दिवसात.” भारतचा ट्रेलर  24 एप्रिलला रिलीज होत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची देखील खास भूमिका आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive