By  
on  

आयुष्मानच्या अभिनयाचा चीनमध्ये डंका, ‘अंधाधुन’ची चीनमध्ये २०० कोटींच्यावर कमाई

आयुष्मान खुराणा एका उत्तम अभिनेता आहे. आजवर अनेक व्यक्तिरेखा त्याने आपल्या अभिनय कौशल्याने लीलया पेलल्या आहेत. अलीकडेच त्याच्या ‘अंधाधुन’मधील कामाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलं आहे. या सिनेमात आयुष्मानसोबत तब्बू आणि राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. त्याचा ‘अंधाधुन’ हा सिनेमा सध्या चीनमध्ये रिलीज झाला आहे.

या सिनेमाने तिथे बरीच लोकप्रियता मिळवली आहे. हा सिनेमा तिथे ‘’पियानो प्लेयर’ नावाने रिलीज झाला आहे. तीन एप्रिलला रिलीज झालेला हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही १०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा सिनेमा भारतात २०१८मध्ये रिलीज झाला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive