By  
on  

हॉरर सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला झाली दुखापत

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या सिनेमाच्या अफलातून यशानंतर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ाता आपला लाडका अभिनेता विकी कौशल लवकरत आपल्या पुढच्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. डेब्यूटंट दिग्दर्शक भानू प्रताप सिंह यांच्या आगामी हॉररपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या गुजरातमध्ये सुरू आहे आणि एका साहसी दृश्याचं शूटिंग करताना विकी दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्या गालाच्या हाडाला जबर मार लागला. त्याला टाकेसुध्दा पडले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी एका जहाजावर साहस दृश्ये शूट करत होता. त्याला धावत जाऊन जहाजावरील एक दरवाजा उघडायचा होता. पण अचानक तो दरवाजा धाडकन त्याच्यावरच आदळला आणि विकीला जबर दुखापत झाली. या अपघातानंतर त्याला ताडतडीने रुग्णालयात हलवण्यात आले आणि आज शुक्रवारी सकाळी तो मुंबईसाठी रवाना झाला. ़ मुंबईतही तो डॉक्टरांकडे यावर उपचार घेणार असून पूर्ण बरा झाल्यावर पुन्हा सेटवर परतेल.

https://www.instagram.com/p/BvoelmLF701/

Recommended

PeepingMoon Exclusive