By  
on  

तेलुगु सिनेमाचा रिमेक असलेल्या शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ ला पाहिलंत का?

अभिनेता शाहिद कपूर त्याच्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखला जातो. सध्या शाहरुख ‘कबीर सिंह’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीजर काही दिवसांपुर्वीच रिलीज झाला होता. शाहिदचा यातील एकुण अवतार प्रेक्षकांना उडता पंजाब सिनेमाची आठवण करून देईल असाच आहे.

https://www.youtube.com/watch?v=eq2ek0mdji4

या सिनेमात प्रेमभंग झालेल्या सर्जनची कथा आहे. प्रेमभंगानंतर स्वत:ला संपवण्यासाठी हा डॉक्टर कोणत्याही थराला जातो. हा सिनेमा एका तेलुगु सिनेमाचा रिमेक आहे. या भूमिकेसाठी शहिदने १४ किलो वजन कमी केलं आहे. या सिनेमासाठी अनेकदा शाहिदला दिवसभरात २० सिगरेट्स ओढाव्या लागयच्या असंही त्याने एका मुलाखतीमध्ये कबूल केलं आहे. या सिनेमात शाहिद सोबत कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा २१ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive