By  
on  

‘द कपिल शर्मा’ शो ची शान वाढवण्यास येणार ही ‘बेस्ट फ्रेंड्स’ची जोडी

सध्या पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. दरवेळी या शोमध्ये वेगवेगळे पाहुणे रसिकांच्या भेटीला येत असतात. यावेळी देखील बॉलिवूडचे बेस्ट फ्रेंडस या शोमध्ये चार चांद लावताना दिसत आहे. यावेळी करण जोहर आणि काजोल यांची जोडी या शोमध्ये दिसणार आहे.

काजोल आणि करण यांच्या जोडीने शोचं वातावरण बदललंच पण प्रत्येकाला आपलं फॅन देखील बनवलं. यावेळी काजोलने गुलाबी रंगाचा पॅंटसूट घातला होता तर करणने काळ्या रंगाचा सूट घातला होता. आता काजोलचा बबली स्वभाव आणि करणचा हजरजबाबीपणा यामुळे कपिलच्या शो मध्ये कशी रंगत येते ते पाहणं मनोरंजक ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive