By  
on  

जान्हवी कपूरला करायचं आहे या यशस्वी अभिनेत्याला किस

अलीकडेच अभिनेत्री जान्हवी कपूरने बहीण खुषीसोबत एका चॅटशोला हजेरी लावली. कलर्स इन्फिनिटी शोच्या ओपनिंग एपिसोडला या भगिनींनी हजेरी लावली. यावेळी जान्हवीला विचारलं गेलं की तिला कोणाला किस करायला आवडेल कार्तिक आर्यन कि विकी कौशल? यावेळी जान्हवीने कार्तिकच्या ऐवजी विकीला किस करायला आवडेल असं सांगितलं.

https://twitter.com/colors_infinity/status/1119933802388836352

विशेष म्हणजे जान्हवी आणि विकी करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ मधून रसिकांसमोर येत आहेत. जान्हवीची प्रतिस्पर्धी असलेल्या सारा अली खानलाही एका चॅट शोमध्ये असाच प्रश्न विचारला गेल्यावर तिने कार्तिक आर्यन असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर तिला इम्तियाज अली दिग्दर्शित लव्ह आज कल २ मध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे. साराचं बॉलिवूडमध्ये अजून कुणाशी नाव जोडलं गेलं नसलं तरी जान्हवीचं नाव मात्र धडकचा कोस्टार ईशान खट्टरशी जोडलं गेलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive