By  
on  

गीतची व्यक्तिरेखा माझ्या मनाच्या सगळ्यात जवळ : करीना कपूर खान

बॉलिवूडमधील काही मातब्बर नावांपैकी एक म्हणजे करीना कपूर खान. करीनाचा बॉलिवूड प्रवास अनेक वळणांचा आहे. करीनाने नुकतीच राजीव मसांद यांच्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी करीनाने भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=Zpnj0afXZZs

यावेळी तिला विचारलं गेलं की २० वर्षांच्या अभिनयातील करीअरमध्ये तिची सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा कोणती आहे? त्यावेळी करीनाने उत्तर दिलं अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत. जसं की चमेलीमधील, ओमकारामधील पण याठिकाणी एक खास नाव घेण्याची मला इच्छा आहे. हे नाव आहे ‘गीत’चं. या पात्राने अनेकांना प्रेरणा दिली. मलाही वाटतं की गीतच्या व्यक्तिरेखेत मी जीव ओतून अभिनय केला होता. गीत ही व्यक्तिरेखा करीना २००७मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ सिनेमात होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive