By  
on  

मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणतो.....

सध्या बी टाऊनचा सर्वात हॉट टॉपिक कोणता असेल, तर तो म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची रिलेशनशीप. सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगते. पॅपाराझीसुध्दा या लव्हबर्ड्सना आपल्या कॅमे-यात नेहमी अचूक कैद करतात. त्यामुळे या दोघांचंही दुनियेपासून आपलं नातं लपवून ठेवण्याचा लपाछपीचा खेळ आता जास्त काळ टिकू शकलेला नाही.

महत्त्वाचं म्हणजे आपल्या नात्याला अधिकृतचा शिक्का देण्यासाठी ्अर्जुन आणि मलायका हे दोघं एप्रिलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्नंबंधनात अडकणार अशा चर्चांना मध्यंतरी प्रचंड उधाण आलं होतं. प्रसिध्दी माध्यमांपासून नेहमीच आपलं नातं लपवून ठेवणा-ाया या जोडप्याने पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. मलायकाबद्दल अर्जुन नुकतंच जे काही म्हणाला ते ऐकून तिचं त्याच्यावरचं प्रेम आणखी गाढ होणार आहे.

एका इंग्रजी वर्जमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, अर्जुन आपल्या 45 वर्षीय गर्लफ्रेंडबद्दल सांगतो," सर्वकाही समोर आहे. माझ्याकडे लपविण्यासाठी काहीच नाही. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्याला अजिबातच जस्टिफाई नाही करायचं. माझ्या जवळ खुप चांगले लोक आहेत आणि मी स्वत:ला यासाठी भाग्यवान समजतो की ते सतत माझ्या आसपास असतात."

Recommended

PeepingMoon Exclusive