By  
on  

पाहा Video:सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा पुन्हा एकदा प्रत्यय; पोलिसांत तक्रार दाखल

सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा आणि उध्दटपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सलमान खान 24 एप्रिल रोजी डीएन नगर येथे सायकलिंगचा मनोसोक्त आनंद लुटत होता आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अनेक जण त्याचे फोटो घेण्यासाठी धडपडत होते. त्या दरम्यान एका प्रसिध्दी माध्यमातील तरुणाने बॉलिवूड दबंग खानचा सायकलिंगचा आपल्या कॅमे-यात व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या इसमाच्या हातातून दबंग खानने कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बॉडीगार्ड व सलमानने त्याच्यावर अरेरावी केली.

पाहा व्हिडीओ :

https://youtu.be/j_ueUh89jr4

Recommended

PeepingMoon Exclusive