By  
on  

प्रियांकाची वहिनी इशिता कुमारवर झाली शस्त्रक्रिया, सोशल मिडीयावर शेअर केला फोटो

देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशी गेली असली तरी भारतात तिचं येणं जाणं सुरुच असतं. लवकरच तिचा भाऊ सिध्दार्थ चोप्राचं लग्न आहे. त्यामुळे तिचं लग्नाच्या तयारीसाठी भारतात येण वाढलं आहे. प्रियांका सध्या मुंबईतच आहे. पण भावाच्या लग्नाच्या धामधूमीपूर्वीच एक वेगळीच बातमी नुकतीच समजली आहे.

प्रियांकाची होणारी वहिनी इशिता कुमार हिने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. पण हा नेहमीसाऱखा कुठल्याही समारंभातला किंवा फिरायला गेलेल्.या ठिकाणाचा नसून इशिताने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेला फोटो शेअर केला आहे. इशितावर कुठलीतरी सर्जरी झालीय आणि तिने कॅप्शन दिलंय, सर्जरीनंतर आता मी पुन्हा रिकव्हर होतेय.हे फार वेदनादायी होतं पण मी आता हळहळू बरी होतेय.

https://www.instagram.com/p/BwtPlDLg19f/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive