By  
on  

वरुण धवनने नताशा सोबतचा साखरपुडा या कारणासाठी पुढे ढकलला

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि गुणी अभिनेता अशी छाप पाडणारा वरुण धवनचा नुकताच 'कलंक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये वरुण आत्तापर्यंत व्यस्त होता. पण हे वर्ष त्याच्यासाठी खास आहे. लवकरच तो आपली जुनी मैत्रीण आणि गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या होत्या. पण आता हा साखरपुडा लांबणीवर पडल्याचं वृत्त आहे.

एका आघाडीच्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, 'कुली नं 1' च्या सिक्वेलच्या तयारीसाठी वरुण सध्या खुप व्यस्त असणार आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन यांचा 1995 साली आलेल्या 'कुली नं 1' चा हा सिक्वेल आहे. त्यामुळे तो संपूर्णपणे या प्रोजेक्टमध्येच लक्ष केंद्रित करतोय.म्हणूनच त्याने नताशासोबतचा आपला साखरपुडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नताशा जेव्हा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या रिसेप्शनला वरुण धवनच्या आई-वडिलांसोबत पोहचली होती, तेव्हाच सर्वांना यंदा वरुण नताशासोबत विवाहबंधनात अडकणार याची कल्पना आली होती.

https://www.instagram.com/p/Bp41z-iHrQF/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive