By  
on  

सनी लिओनचा जलवा आता हॉरर कॉमेडी सिनेमात

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनचे चाहते तिच्या सिनेमांविषयी आणि आगामी प्रोजेक्टविषयी नेहमीच उत्सुक असतात. तीसुध्द सतत आपल्या चाहत्यांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असते. सनी लिओन लवकरच एका हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार असल्याचं वृत्त आहे. या सिनेमाचं नाव 'कोका कोला' असल्याचं बोललं जात आहे.

स्त्री या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर आता बॉलिवूडमध्ये असे सिनेमे बनवण्याचा कल वाढला आहे. त्यामुळेच आता हॉरर कॉमेडी सिनेमात झळकण्याचा मोह सनीला आवरता आलेला नाही.

या सिनेमाचे निर्माते महेंद्र कुमार या वृत्ताला दुजोरा देत म्हणाले," आम्ही आमच्या आगामी हॉरर कॉमेडी सिनेमासाठी अभिनेत्री सनी लिओनला साईन केलं आहे.आता हॉरर कॉमेडी सिनेमे प्रेक्षकांना आवडू लागले आहेत. म्हणून आम्हीसुध्दा असाच सिनेमा घेऊन येण्याचं ठरवलं आहे. या सिनेमाचं नाव आम्ही 'कोका कोला' म्हणून रजिस्टरसुध्दा करुन ठेवलं आहे. त्यामुळे भविष्यात कुठला प्रॉब्लेम येणार नाही. तसंच येत्या जूनपासून हा सिनेमा फ्लोअरवर जाईल आणि ह्याचं बरंचसं शूटींग डेहराडून, मसूरी आणि हरिव्दारमध्ये होणार आहे."

https://www.instagram.com/p/Bu8wMUSh6aH/

Recommended

PeepingMoon Exclusive