By  
on  

सलमान-कतरिनाची लव्हस्टोरी उलगडणा-या ‘चाशनी’ गाण्याचा टीजर रिलीज

भारतच्या निर्मात्यांनी रसिकांच्या उत्सुकतेला वाट करून देण्यासाठी सलमान-कतरिना केमिस्ट्रीच्या ‘चाशनी’ गाण्याचा टीजर रिलीज केला आहे. या गाण्यात सलमान आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतील यात शंका नाही.

https://www.youtube.com/watch?time_continue=15&v=9LgAFJugE-s

सलमान आणि कतरिनावर चित्रित झालेल्या गाण्याचा टीजर निर्मात्यांनी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणला आहे. माल्टामधील निसर्गरम्य देखाव्यांवर चित्रित झालेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’चं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं असून ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive