By  
on  

काय आहेत, विराटचे अनुष्काच्या वाढदिवसानिमित्तचे खास प्लॅन्स?

आज बॉलिवुडची गुणी अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीने काही खास प्लॅन  केले आहेत. तिला स्पेशल फिल करण्याची एकही संधी तो अजिबातच सोडत नाही. अनुष्काचा वाढदिवस म्हणजे त्याच्यासाठी एखाद्या उत्सवाप्रमाणेच आहे. अनुष्काच्या वाढदिवसासाठी विराटने बॅंगलोरमध्ये एक डिनर प्लॅन केला आहे. त्यामुळे वाढदिवस आणि एक संपूर्ण दिवस एकमेकांसोबत हे सेलिब्रिटी कपल असतील.

कामाच्या बिझी शेड्यूलमुळे निवांत एकमेकांसाठी असे काही क्षण फारच कमी मिळतात. त्यात वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी हे हक्काने सेलिब्रेट करण्याचे या सेलिब्रिटी कपलचे दिवस. सूत्रांच्या माहितीनुसार, विराटला अनुष्काच्या    वाढदिवसाचं आजचं प्लॅनिंग खुपच खासगी ठेवायचंय.

 

तसंही वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर दोघंही आपापल्या कामात बिझी होतील. आता आयपीएलनंतर विराट आता वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे तर अनुष्का आपल्या आगामी सिनेमांच्या प्रोजेक्टसकडे लक्ष देणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive