By  
on  

अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, या दिवशी होणार प्रदर्शित

अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सिनेमावर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ह्या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी 24 मे ही तारीख निश्चित करण्यात आली असून संपूर्ण देशभरात हा सिनेमा तेव्हा प्रदर्शित होईल.

देशभरात सध्या लोकसभा निवडणूकींचा डंका पिटला होता. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडून 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध करण्यात आला होता.  निवडणूक आयोगानेसुध्दा याची गंभीर दखल घेत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सिनेमा प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले.

या सिनेमात अभिनेता विवेक ओबेराय पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या लूकमध्ये विवेक कुठेही ओळखू येत नाही. हा लूक पंतप्रधानांच्या लूकच्या जवळपास जाणारा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. खरं तर अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून लांब असलेल्या विवेक ओबेरॉयची या सिनेमासाठी झालेली निवड अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केलं आहे. उमंग यांनी यापूर्वी 'मेरी कोम' आणि 'सरबजीत' यांसारख्या बायोपिक्सचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 23 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive