By  
on  

सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरच्या रात्रीचा अनुभव

लोभस हास्य असलेल्या सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. ती अलीकडेच न्युयॉर्कमध्ये उपचार घेऊन भारतात परत आली आहे. सोनालीने नुकताच तिचा यासंदर्भातील अनुभव शेअर केला आहे. कॅन्सरचं निदान झाल्यावरची रात्र सोनालीसाठी अत्यंत कठीण असल्याचं तिने सांगितलं आहे. याबाबत सोनाली म्हणते, ती रात्र माझ्यासाठी अतिशय वाईट होतं. माझ्या आजाराचं निदान कॅन्सर आहे हे समजल्यावर मी रात्रभर झोपू शकले नव्हते.’ पण रात्रभर रडल्यानंतर मी विचार केला सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यावर मी ठरवलं की आता परिस्थितीला शरण जायचं नाही तर लढायचं. मी त्यावेळी सुर्योदय पाहिला. फोटो काढला मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करत कॅप्शन दिलं स्विच ऑन द सनशाइन.’

सोनालीने अलीकडेच  ‘बीएफएफ विथ वोग सीजन 3’या नेहा धुपिया होस्ट करत असलेल्या शोमध्ये सुझान खान आणिगायत्री जोशीसोबत हजेरी लावली होती.

 

Recommended

PeepingMoon Exclusive