By  
on  

अखेर ठरली आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ची रिलीज डेट, यादिवशी होणार रिलीज

निवडक सिनेमांमध्येच काम करणारा अभिनेता आमिर खान आता ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमातून रसिकांसमोर येत आहे. आमिरच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी असली तरी या सिनेमासाठी वाट पहावी लागणार आहे. हा सिनेमा २०२०च्या ख्रिसमसवेळी रसिकांच्या भेटीला येत आहे. आमिर खान प्रॉड्क्शनमध्ये बनत असलेल्या या सिनेमाला अद्वैत चंदन दिग्दर्शित करत आहेत. अद्वैत चंदन यांनी यापुर्वी आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘लाल सिंह चढ्ढा’ हा सिनेमा हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’ ‘या सिनेमाचं ऑफिशियल अ‍ॅडॉप्शन आहे. या सिनेमासाठी आमिरने स्वत:मध्ये कमालीचा बदल केला आहे. या सिनेमाचं यश आमिर खानसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याच्या मागील ‘ठ्ग्ज ऑफ हिंदोस्तान’ने फारशी चमक दाखवली नव्हती.

Recommended

PeepingMoon Exclusive