By  
on  

सैफ अली खान आणि तब्बू तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकत्र

अभिनेता सैफ अली खान त्याच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात सैफ अली खान सोबत अभिनेत्री तब्बू सुद्धा झळकणार आहे. या निमित्ताने सैफ अली खान आणि तब्बू ही जोडी तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहे.

एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तानुसार या सिनेमात तब्बू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून ही वेगळी भूमिका तब्बू तीच्या अभिनयाने चांगली साकारू शकत असल्याचा विश्वास सिनेमाच्या निर्मात्यांना आहे.

सैफ अली खान आणि तब्बू यांनी यापूर्वी ‘तू चोर मैं सिपाही’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘बीवी नंबर 1’. यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यामुळे या सिनेमात ही जोडी काय कमाल करते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

'जवानी जानेमन' या सिनेमात अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलीया फर्नीचरवाला ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आलिया या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून नितीन कक्कर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive