गर्लफ्रेंड नताशा दलालचा वाढदिवस साजरा करतानाचा वरुणचा व्हिडिओ पाहिलात का?

By  
on  

वरुण धवन आणि नताशा दलाल ही बॉलीवूडमधली एक रोमँटीक जोडी. अनेक पार्टी तसेच इव्हेंटमध्ये ही जोडी एकत्र दिसली आहे. आज नताशा दलालचा वाढदिवस असून ती ३० वर्षांची झाली आहे. या निमित्ताने नताशाने वरुण आणि तीच्या मित्रांसोबत मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये वाढदिवसाचं सेलीब्रेशन केलं. वरुणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नताशा केक कापतानाचा व्हिडीओ पोस्ट केला असून कामाच्या गडबडीत त्याने नताशाच्या वाढदिवसासाठी वेळ काढला आहे.

वरूण आणि नताशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याने अनेक ठिकाणी नताशाची तारीफ केली आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामधील एका भागात वरुणने नताशाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,'' नताशाचं स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे. तिची स्वतःची अशी ठाम मतं आहेत. माझ्या करियरमध्ये नेहमी तिची साथ मला लाभली आहे.''

[video width="480" height="600" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/05/varun_natasha_addict120_60193399_320923852148144_2978396791968953004_n.mp4"][/video]

वरुण आणि नताशा यांच्या लग्नासंबंधी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत डेव्हिड धवन म्हणाले,''पुढील वर्षी दोघांचं लग्न होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नात्यासंबंधात मी खुश असून एका बापाला अजून काय पाहिजे!'' अशी प्रशंसा त्यांनी केली. त्यामुळे दोघांच्या लग्नासाठी वरुणच्या चाहत्यांना पुढील वर्षांची वाट पाहावी लागेल.

https://www.instagram.com/p/BxLw-pBgYe8/

Recommended

Loading...
Share