सलमान खानच्या दबंग अंदाजात 'मुन्नी बदनाम हुई' हे गाणं पुन्हा रिक्रीएट होणार

By  
on  

सलमान खान दबंग लूकमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या 'दबंग ३' सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून मध्यप्रदेश येथील शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाचं पुढचं शूटिंग मुंबई येथे होणार आहे.

https://www.instagram.com/p/Bwt7_z8FhXH/?utm_source=ig_web_copy_link

'दबंग' सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. दबंग सिनेमाच्या पहिल्या भागातील 'मुन्नी बदनाम हुई' हे गाणं सगळीकडे लोकप्रिय झालं. मलायका अरोराच्या दिलखेचक अदांनी हे गाणं हिट झालं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार दबंगच्या तिसऱ्या भागात हे गाणं थोडेफार बदल करून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दबंग ३ मध्ये सुद्धा हे गाणं असून यावेळेस मुन्नीला नाही तर मुन्नाला बदनाम केलं जाणार आहे. सलमान खानवर हे गाणं चित्रित होणार असून सलमानचा एक अनोखा अंदाज या गाण्यानिमित्ताने सलमानच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'दबंग ३' हा सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share