By  
on  

आयुष्मान खुराणा आता साकारणार समलैगिंक व्यक्तिरेखा, व्हिडियो केला शेअर

आयुष्मान खुराणाच्या हटके व्यक्तिरेखांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. आयुष्मानच्या ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाचा सिक्वेल येत आहे. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ असं या नव्या सिनेमाचं नाव असेल. यात देखील पुर्वीच्या सिनेमाप्रमाणे एक लव्हस्टोरी असेल पण यात स्टोरीतही एक ट्वीस्ट असणार आहे. ही लव्हस्टोरी एका गे कपलची असणार आहे.

https://www.instagram.com/p/BxPM664hfsV/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाचा एक व्हिडियो आयुष्मानने नुकताच शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘शुभमंगल सावधान च्या यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत, शुभमंगल ज्यादा सावधान. आम्ही कष्ट थोडे जास्त घेऊ, तुम्हीही थोडं जास्त प्रेम करा’. आनंद राय यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात आयुष्मानसोबत कोण दिसणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हितेश केवल्य हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या पुर्वीचा भाग प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला होता. पण ते दुस-या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ही संधी हितेशकडे चालून आली.

Recommended

PeepingMoon Exclusive