By  
on  

चिन्यांवर आता श्रीदेवीच्या अभिनयाचा प्रभाव, चीनमध्ये ‘मॉम’ ने केली इतकी कमाई

कलाकार त्याच्या कलेच्या रुपाने अमर असतो असं म्हटलं जातं. श्रीदेवीच्या ‘मॉम’ सिनेमाने हे सिद्ध केलं आहे. ‘अंधाधुन’ सिनेमानंतर चीनमध्ये श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ११.४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेसमीक्षक तरन आदर्श या6नी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. याशिवाय वीकेंडमध्ये या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी ‘मदर्स डे’ निमित्त या सिनेमाच्या कमाईत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1127089962162122753

रवी उद्यावर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सावत्र मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणा-या खंबीर आईची व्यक्तिरेखा या सिनेमात श्रीदेवींनी साकारली आहे. चीनमधील यशाबद्दल या सिनेमाचे निर्माते बोनी कपुर म्हणतात, ‘मॉम हा सिनेमा माझ्या मनाच्या खुप जवळ आहे. चीनमधील यशाने मी आनंदित झालो आहे. श्री आपल्यात असायला हवी होती. तिलाही या यशाचा आनंद झाला असता.’ या सिनेमातील अभिनयासाठी श्रीदेवीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive