By  
on  

‘मॉम’ नंतर आता हृतिक रोशनचा ‘काबिल’ चीनमध्ये प्रदर्शित होणार

नेहमीपेक्षा हटके सिनेमे करणारा अभिनेता म्हणून ह्रतिक रोशन ओळखला जातो. ‘काबिल’ हा त्यापैकीच एक हटके सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हृतिकचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहोचणार आहे. हा सिनेमा लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ चीनमध्ये ५ जूनला रिलीज होणार आहे. क्राईम थ्रिलर असणा-या काबिलमधील हृतिक आणि यामीची केमिस्ट्री रसिकांना पसंत पडली होती. हा सिनेमा हृतिकचा होम प्रॉडक्शन सिनेमा आहे. राकेश रोशन या सिनेमाचे निर्माते होते तर संजय गुप्ता यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हृतिकने या सिनेमात एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे.

भारतात हा सिनेमा २५ जानेवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमाने बॉक्स ऑफिवर १२६.८५ कोटींचा गल्ला जमवला होता. चीनमध्ये यापुर्वीही भारतीय सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. ‘अंधाधुन’, ‘मॉम’ सारख्या सिनेमांनी तिथे चांगला बिझिनेस केला होता.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive