By  
on  

16 वर्षांनंतर अभिनेत्री करिष्मा कपूर करणार या कलाकारासोबत काम

अभिनेत्री करिष्मा कपूर बराच काळ अभिनयापासून दूर आहे. आता करिष्मा कपूर एका डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ती १६ वर्षांनंतर अभिनेता डीनो मोरिया सोबत काम करत आहे. या दोघांनी २००३ साली आलेल्या 'बाज - ए बर्ड इन डेंजर' या सिनेमात काम केले होते. या डिजिटल प्रोजेक्टचं शीर्षक 'मेंटलहूड' असं आहे. एका महत्वाकांशी महिलेच्या अवतीभवती या सिरीजचं कथानक गुंफण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये डीनो मोरिया एक पुरुषप्रधान भूमिकेत दिसणार आहे. श्रुति सेठ और संध्या मृदुल या कलाकारांच्या सुद्धा या सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.

या आगामी प्रोजेक्टशी संबंधीत अजून माहिती कळाली नसली तरी सूत्रांच्या सांगण्यानुसार इतक्या वर्षानंतर काम करत असूनही करिश्मा कपूर आणि डीनो मोरियात कोणताही अवघडलेपणा जाणून येत नाही. दोघंही काम झाल्यावर एकमेकांशी गप्पा मारत असतात.

करिश्मा कपूरने २०१२ साली डेंजरस इश्क या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. परंतु तीचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. करिश्मा कपूर जाहिरात क्षेत्रात मात्र लोकप्रिय आहे. या आगामी प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive