टायगर श्रॉफ स्टारर 'रेंबो'चा हिंदी रिमेक या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

'स्टुडंट ऑफ द इयर 2' नंतर टायगर श्रॉफने आता आपला मोर्चा पुढील सिनेमांकडे वळवला आहे. त्याच्या सुपरहीट 'बागी' फ्रेंचायझीचा 3 रा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात टायगर आणि श्रध्दा कपूर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे. पण साजिद नाडियाडवाला निर्मित हा प्रोजेक्ट लवकर संपवून टायगर आता एका नव्या सिनेमाकडे लक्ष केंद्रित करु पाहतोय.

सिल्वेस्टर स्टेलोनची ब्लॉकब्लस्टर हॉलिवूड फ्रेंचायजी रेंबोचा हिंदी रिमेक लवकरत येतोय. ह्यात टायगर प्रमुख भूमिकेत झळकतोय. सिद्धार्थ आनंद द्वारा दिग्दर्शित हा अॅडव्हेन्चर्स सिनेमा जानेवारी 2020 रोजी फ्लोअरवर जाईल.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, "आम्ही ह्या सिनेमावर काम सुरु केलं असून टागरसुध्दा याची यंदा नोव्हेंबर डिसेंबपासून तयारी सुरु करेल. या हिंदी रिमेकचं शूटींग भारतात आणि परदेशांतील ठिकाणांवर होणार आहे. आम्ही या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख 2 ऑक्टोबर 2020 गांधी जयंती असल्याचे आधीच जाहीर करुन टाकले आहे."

 

Recommended

Loading...
Share