अमिताभ बच्चन यांनी शेयर केला करीना कपूरच्या बालपणीचा हा निरागस फोटो

By  
on  

अमिताभ बच्चन हे आपल्या अनोख्या भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. तसेच ते सोशल मीडियावर सुद्धा कायम ऍक्टिव्ह असतात. नुकताच अमिताभ यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला या फोटोत अमिताभ यांच्यासोबत एक छोटी मुलगी दिसत आहे. ही छोटी मुलगी अभिनेत्री करीना कपूर असल्याचं अमिताभ यांनी संगितलं. पुकार या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेस छोटी करीना आपले बाबा रणधीर कपूर यांच्यासोबत आल्याची एक आठवण अमिताभ यांनी या फोटोद्वारे सांगितली आहे.

https://www.instagram.com/p/BxjIHoIhExa/

१९८३ साली आलेल्या 'पुकार' या सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये अमिताभ हे छोट्या करीनाच्या पायाला बाम लावत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोखाली अमिताभ यांनी लिहिलं आहे की,'ओळखा कोण आहे ही? ही करीना कपूर असून आपले बाबा रणधीर यांच्यासोबत ती पुकार सिनेमाच्या सेट वर आली होती. तीच्या पायाला दुखापत झाली असल्याने मी तीच्या नाजूक पायांना औषध लावत आहे.'

१९८३ साली आलेल्या 'पुकार' या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणधीर कपूर यांनी काम केले होते. अमिताभ यांनी शेयर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

Recommended

Loading...
Share