By  
on  

Exclusive: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचं 'बॅडबॉय' सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण

पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर राजकुमार संतोषी यांनी निर्माते साजिद कुरेशी यांच्यासोबत एका रोमँटीक कॉमेडी सिनेमासाठी करार केला आहे. या सिनेमाचं नाव 'बॅडबॉय' असं असून या सिनेमाद्वारेअभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती आणि निर्माते साजिद कुरेशी यांची मुलगी अमरीन कुरेशी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग सध्या बंगलोर येथे सुरु आहे.

राजकुमार संतोषी 'फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमानंतर सहा वर्षांनी 'बॅडबॉय' सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या सिनेमाबाबत अधिक माहिती कळाली नसली तरी जुलैपर्यंत या सिनेमाचं शूटिंग संपणार आहे. या वर्षीच्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive