By  
on  

‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय रोहित शेट्टीच्या आतापर्यंतच्या हिरोंपेक्षा वेगळ्या रुपात

‘सिंबाचं’ यश साजरं करतानाच रोहित आगामी सुर्यवंशीच्या तयारीला लागला आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक बाबी आता समोर येत आहेत. रोहितने या सिनेमातील अक्षयच्या लूक विषयी बोलताना सांगितलं की, ‘अक्षयचा लूक आतापर्यंतच्या माझ्या सिनेमातील पोलिस अधिका-यांपेक्षा वेगळा असेल. या सिनेमात अक्षय एक स्टायलिश कॉप असेल.’ रोहितने आजवर अनेक उत्त्तम पोलिसपट बॉलिवूड्ला दिले आहेत. रोहितच्या या कॉप युनिव्हर्समध्ये सिंघम', 'सिंघम रिटर्न', 'सिंबा’ अणि आता सुर्यवंशीचा समावेश आहे. रोहित याशिवाय अजय देवगण, रणवीर सिंह आणि अक्षय यांच्यासोबत आणखी एक सिनेमा प्लॅन करत असल्याचंही बोललं जात आहे.

https://www.instagram.com/p/BwirrnGhvKQ/?utm_source=ig_web_copy_link

सिंघम’मध्ये अजय भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होता तर ‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय आतंकवादाविरुद्ध लढताना दिसेल. या सिनेमात अक्षय वीर सुर्यवंशी या अधिका-याची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय आणि रोहित पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. हा सिनेमा २२ मे २०२०ला रिलीज होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive