By  
on  

'मलाल' सिनेमाचे दिग्दर्शक कोण आहेत माहीत आहे का?

संजय लीला भन्साळी निर्मित 'मलाल' सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमातुन जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मंगेश हाडवळे करत आहेत.

मंगेश हाडवळे हे नाव बॉलीवूडला नवं नाही. यापूर्वी त्यांनी 'देख इंडियन सर्कस' या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि तनिष्ठा चॅटर्जी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले.

https://www.youtube.com/watch?time_continue=2&v=zRuL6Ykrnrg

परंतु मंगेश हाडवळे यांची खरी ओळख 'टिंग्या' या सिनेमामुळे आहे. २००८ साली आलेल्या 'टिंग्या' या मराठी सिनेमाची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांत दखल घेण्यात आली. प्रेक्षकांची आणि समीक्षकांची सुद्धा या सिनेमाला पसंती मिळाली. आता मंगेश हाडवळे पुन्हा एकदा 'मलाल' सिनेमाद्वारे दिग्दर्शनाची धुरा हाती घेणार आहेत.

एक वेगळी प्रेमकथा असलेल्या 'मलाल' सिनेमाची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली आहे. हा सिनेमा २८ जुन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive