By  
on  

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या धर्तीवर अक्षयने शेअर केला ‘हाऊसफुल ऑफ थ्रोन्स’चा फोटो

गेले काही दिवस सोशल मिडियात चर्चा आहे ती ‘गेम ऑफ थ्रोन्स’या वेबसिरीजची. या वेबसिरीजने परदेशातच नव्हे तर भारतातही आपले फॅन निर्माण केले आहेत. यापासून बॉलिवूड सेलिब्रिटीही लांब नाहीत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने या वेबसिरीजच्या धर्तीवर ‘हाऊसफुल ४’च्या सेटवरून एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सगळी स्टारकास्ट एक हाडांच्या सापळ्यांनी बनलेल्या खुर्चीवर बसलेली आहे. या फोटोत अक्षयसोबत रितेश देशमुख, क्रिती सेनन, पूजा हेगड़े, बॉबी देओल आणि क्रिती खरबंदा हे कलाकार आहेत.

https://www.instagram.com/p/BxrQUsQnBqH/?utm_source=ig_web_copy_link

सिनेमाच्या सेटवरून घेतलेला हा फोटो शुटिंगच्या शेवटच्या शेड्युलचा आहे. एका गाण्याचं शुटिंग या शेड्युलमध्ये सुरु आहे. हाऊसफुल फ्रॅंचाईजीमधील हा चौथा सिनेमा आहे. अक्षय सुरुवातीपासून या सिनेमाचा एक भाग आहे. प्रत्येक भागात नवीन कलाकार या सिनेमाशी जोडले गेले आहेत. फरहाद सामजी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. मघ्यंतरी ‘मी टू’ प्रकरणामुळे या सिनेमाचं शुटिंग थांबलं होतं. पण हा सिनेमा २५ ऑक्टोंबरला रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive