By  
on  

२५ वर्षांपुर्वी याच दिवशी भारताला मिळाली होती पहिली मिस युनिव्हर्स

अभिनेत्री सुश्मिता सेनने आजपासून जवळपास २५ वर्षांपुर्वी भारताला पहिला ‘मिस युनिव्हर्स’ किताब मिळाला होता. सुश्मिता हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली. १९९४ मध्ये २१ मे ला सुश्मिताने भारताला हा गौरव प्राप्त करून दिला. त्यामुळे यादिवशी सुश्मितावर प्रत्येकाने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा देखील समावेश आहे.

रोहमनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुश्मिताचा मुकुट परिधान केलेला फोटो आहे. या फोटोला कॅप्शन देताना रोहमन म्हणतो, ‘युनिव्हर्स जिंकून २५ वर्षं पुर्ण झाली.’ सुश्मितानेदेखील या शुभेच्छांसाठी सगळ्यांचे आभार मानले आहेत.  वयाच्या १८ व्या वर्षी सुश्मिताने हा किताब जिंकला होता. त्यानंतर ‘दस्तक’ सिनेमातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेऊन समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive