By  
on  

पठडीबाहेरच्या रोमांचची अनुभूती देणारा सिनेमा : ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’

नाव: इंडियाज मोस्ट वॉन्टेड

कलाकार : अर्जुन कपूर, सुदेव नायर, अमृता पुरी, राजेश शर्मा

दिग्दर्शक: राज कुमार गुप्ता

रेटिंग : 3.5

देशभक्ती, गुप्तचर संस्था, गुप्तहेर याविषयी आजवर अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांचा खास असा प्रेक्षकवर्ग देखील असतो. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी याच वळणावर जाताना काहीसा हटके सिनेमा रसिकांसमोर आणला आहे. पठडीबाहेरच्या स्पाय स्टोरीचा अनुभव ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा सिनेमा देईल यात शंका नाही.

कथानक :

या सिनेमाचं कथानक इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचा कुप्रसिद्ध दहशतवादी यासीन भटकळला पकडण्याच्या मोहिमेपासून होते. देशात अनेक बॉम्बस्फोट घडवणा-या यासीनला पकडण्यासाठी देशातील संरक्षण व्यवस्था कंबर कसून तयारीत होत्या. पण त्याला पकडणं इतकं सोपं नव्हतं. अशा वेळी इंटेलिजन्स ब्युरोचे काही अधिकारी स्वत:च्या बंदुकीची एकही गोळी खर्च न करता केवळ हिंमत आणि धाडसाच्या जोरावर अर्जुन आणि त्याची टीम यासीनला पकडते.

दिग्दर्शन :

दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शनातून हटके कथानक खुबीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा हा सिनेमा संथ होतो. पण अर्जुनचं अभिनय कौशल्य सिनेमाला तारुन नेतं.

सिनेमा का पहावा?

हा सिनेमा स्पाय स्टोरी असली तरी त्याला नेहमीप्रमाणे अ‍ॅक्शनचा तडका नाही. कुठेही अवास्तव डायलॉगबाजी नाही. कुठेही खुन खराबा नाही तरीही हा सिनेमा मनाचा ठाव घेण्यास यशस्वी ठरतो.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive