वाढदिवसानिमित्त करण जोहरने घेतली ऋषी आणि नीतू कपूर यांची भेट

By  
on  

करण जोहर सध्या न्यूयॉर्क येथे असून तिथे तो आपल्या ४७व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे. २५ मे रोजी करण जोहरचा वाढदिवस आहे. या खास दिवशी करण जोहरच्या सोबत कोणी असणार हे निश्चित नाही. करण सध्या न्यूयॉर्कला असून योगायोग म्हणजे ऋषी आणि नीतू कपूर सुद्धा तिथे आहेत. त्यामुळे करण आपल्या या आवडत्या जोडीची नुकतीच न्यूयॉर्क येथे आवर्जून भेट घेतली.

या दोघांना भेटल्यानंतर करण जोहर ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेयर केली. 'भारतीय सिनेमातील माझी आवडती जोडी. मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम करत आलोय आणि या दोघांना जवळून अनुभवण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे. हे दोघं खूप प्रेमळ आहेत. नीतूजी आणि चिंटूजी यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा घेऊन मला खूप आनंद झाला आहे.' अशी पोस्ट करणने इंस्टाग्रामवर लिहिली आहे.

https://www.instagram.com/p/Bx09vMtp01X/?utm_source=ig_embed

यानंतर नीतू कपूर यांनी सुद्धा करणने शेयर केलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्याखाली 'करणने आम्हा सर्वांना कडकडून मिठी मारली. या प्रेमातला अर्धा वाटा आई हिरूचा आहे असं तो म्हणाला. कधीकधी साध्या सरळ शब्दांमागे खूप प्रेम लपलेलं असतं', असं लिहिलं

https://www.instagram.com/p/Bx1D_AoAeQI/?utm_source=ig_embed

ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्क येथील स्लोन केटरिंग हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत.
आतापर्यंत त्यांना अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी भेटून आले आहेत.

Recommended

Loading...
Share