By  
on  

सिनेमाच्या यशासाठी विवेकचं सिद्धीविनायकाला साकडंं, आदेश बांदेकरनी केले स्वागत

अभिनेता विवेक ओबेरॉयचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या यशाचं साकडं घालण्यासाठी विवेक सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्याचं स्वागत सिद्धीविनायक मंदिराचे ट्रस्टी आदेश बांदेकर यांनी केलं. यावेळी विवेकची भेट घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चुरस दिसून आली. विवेक ब-याच दिवसांनी पंतप्रधानांच्या बायोपिकमधून रसिकांसमोर आला आहे.

https://www.instagram.com/p/Bx2Es3EnTvg/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपुर्वीच विवेक सोशल मिडियावर टिकेचा धनी ठरला होता. विवेकने सोहल मिडियावर एक मेमे शेअर केला होता. यामध्ये ओपिनिअन पोल अस लिहिलेल्या रकान्यात सलमान आणि ऐश्वर्या दिसत आहेत. तर एक्झिट पोल असं लिहिलेल्या रकान्यात विवेक आणि अ‍ॅशचा फोटो आहे तर रीझल्ट असं लिहिलेल्या रकान्यात अ‍ॅश अभिषेक आणि आराध्याचा फोटो आहे. यावरून विवेकला बरीच टीका सहन करावी लागली. शेवटी त्याने माफी मागत ट्वीट डिलीट केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive