By  
on  

अभिनेते अनुपम खेर यांनी जागवल्या आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमाच्या आठवणी

अनुपम खेर हे हिंदी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी हिंदी सोबतच हॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. अनुपम खेर हे सोशल साईट्सवर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात. नुकतंच त्यांनी आपल्या ट्विटरवरून आपल्या 'सारांश' या आपल्या पहिल्या सिनेमाची आठवण जागवली आहे.

 

 २५ मे १९८४ ला अनुपम खेर यांचा 'सारांश' हा पहिला सिनेमा प्रदर्शित झालेला. या सिनेमात अनुपम यांनी ६५ वर्षांच्या बी.व्ही.प्रधान यांची भूमिका साकारली होती. यावेळी अनुपम यांचं खरं वय हे केवळ २८ वर्ष होता. इतक्या कमी वर्षात ६५ वर्षांचा वयस्कर माणसाची भूमिका साकारणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. परंतु अनुपम यांनी या पहिल्याच सिनेमात प्रभावी काम करून हिंदी सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयाची अनोखी शैली निर्माण केली.

हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज ३५ वर्ष झाली आहेत. गेल्या ३५ वर्षात प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल अनुपम यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive