By  
on  

Exclusive: या सिनेमात जॉन अब्राहमच्या जागी दिसणार अभिनेता सूरज पांचोली

कॅप्टन हवा सिंग हा भारतातले एक नावाजलेले बॉक्सर म्हणून ओळखले जातात. 'भारतीय बॉक्सिंगचे जनक' म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत एक हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात बॉलिवूडचा हॅण्डसम आणि अॅक्शन हिरो  जॉन अब्राहम हा कॅप्टन हवा सिंग यांच्या प्रमुख भूमिकेत काम करणार होता. परंतु पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार या आगामी प्रोजेक्टमध्ये जॉन अब्राहम काम नसून त्याच्या ऐवजी अभिनेता सूरज पांचोली याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

या सिनेमाशी संबंधीत एका सूत्राने पिपींगमूनला माहीती दिली की,''या सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखेसाठी बॉक्सिंगचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं. परंतु सध्याच्या वयात जॉनला हे प्रशिक्षण घेणं खूप कठीण होतं.त्यामुळे या भूमिकेसाठी एका तरुण अभिनेत्याचा शोध सुरु होता. जो अभिनेता बॉक्सिंगचं प्रशिक्षण योग्य रितीने घेऊ शकेल.''

 

या भूमिकेसाठी अखेर सूरज पांचोलीची निवड झाली. गेल्या काही महिन्यांपासून सूरज या सिनेमाशी निगडीत बॉक्सिंगचं प्रशिक्षण दिल्ली येथे घेत आहे. बॉक्सिंग चॅम्पियन विजेंदर सिंग या भूमिकेसाठी सूरजला मदत करत आहे. या सिनेमातील बॉक्सिंगचे प्रसंग खरे वाटावेत म्हणून पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमधून खरे बॉक्सर आणण्यात येणार आहेत.

हवा सिंग हे आशियाचे अतिवजन वर्गवारीतले अत्यंत महत्वाचे खेळाडू होते. त्यांनी १९६१ ते १९७२ या सलग दहा वर्षांच्या काळात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले. सूरज पांचोली या महान खेळाडूची भूमिका कशी साकारतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सूरजने सलमान खान फिल्म्सच्या 'हिरो' या सिनेमातून 2015 साली बॉलिवूड पदार्पण केले होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive