By  
on  

अक्षय कुमार आणि आशाताईंची झाली ‘चाय पे चर्चा’, केला फोटो शेअर

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने अलीकडेच आशाताई भोसले यांच्यासोबतचा प्रसन्न फोटो शेअर केला आहे. एका रविवारची संध्याकाळ या दोन्ही दिग्गजांची भेट झाली. अक्षयने या भेटीचा फोटो सोशल मिडियावर उपलोड केला आहे. यात दोघंही उत्सहित आणि आनंदी दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/Bx7Su7enskk/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोला कॅप्शन देताना अक्षय म्हणतो, ‘आशा भोसले यांना भेटणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. चहा आणि चटपटीत गप्पा यामुळे रविवारची ही संध्याकाळ अतिशय उत्तम गेली.’ या फोटो सोबतच अक्षयचा डिंपल कपाडिया आणि आरजे अनमोल यांच्या सोबतच्या फोटोलाही लाईक्स मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/Bx7eKK5iNQm/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive