By  
on  

'केजीएफ' सिनेमाच्या पुढच्या भागात रविना टंडन साकारणार इंदिरा गांधी

'केजीएफ' सिनेमाच्या पुढच्या भागाची तयारी जोरदार सुरु आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात कन्नड़ सुपरस्टार यश प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. प्रशांत निल हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात रवीना टंडन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रविनाची या सिनेमात अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून आधीच्या भागापेक्षाही हा भाग अत्यंत भव्य असणार आहे. तसेच हा सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

याचबरोबर 'केजीएफ 2' साठी अभिनेता संजय दत्तचं सुद्धा नाव चर्चेत आहे. याविषयी अधिकृत खबर अजून आली नसली तरी या सिनेमाच्या निमित्ताने हे दोन कलाकार एकमेकांसोबत खूप वर्षानंतर एकत्र झळकणार आहेत.

https://www.instagram.com/p/BtsH4mInZYG/

'केजीएफ' सिनेमाच्या पहिल्या भागाने अनपेक्षित रित्या बॉक्स ऑफिसवर यश संपादन केले. त्यामुळे 'केजीएफ 2' कडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive