By  
on  

Exclusive: युलिया वंतुर आणि सनी देओल झळकणार एकत्र, लोकेशन बाबत संदिग्धता

सलमानचा वरदहस्त असलेली अजून एक मॉडेल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. युलिया आणि नवनिर्वाचित खासदार सनी देओल एका सिनेमात झळकणार आहेत.

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार युलिया राधा क्यों गोरी मैं क्यों काला' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार होती. पण काही कारणास्तव हा सिनेमा डब्यात गेला. आता युलिया ‘मोह मोह के धागे’ या सिनेमातून समोर येणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात सनी देओल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं शुटिंग पोलैंड, मथुरा, दिल्ली आणि गोवा येथे होणार आहे. या सिनेमात युलिया कृष्णभक्ताची भूमिका साकारत आहे. पण मथुरामध्ये शुटिंग करण्यास सनी फारसा उत्सुक नाही. कारण हा हेमामालिनीचा मतदार संघ आहे. त्यामुळे या सिनेमाचं लोकेशन मथुरा असेल की नाही याबाबत संदिग्धता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive