By  
on  

मोगॅम्बो पुन्हा खुश होणार, 'मिस्टर इंडिया' पुन्हा येण्याची शक्यता?

अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनानंतर श्रीदेवी यांचे पती आणि निर्माते बोनी कपूर हे 'मिस्टर इंडिया' सिनेमाच्या सीक्वेलवर काम करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत होते. तसेच मध्यंतरी झालेल्या मुलाखतीमध्ये 'मिस्टर इंडिया' सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रीदेवी शिवाय मिस्टर इंडिया बनवण्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे अनिल कपूर आणि शेखर कपूर मिस्टर इंडियाच्या पुढच्या भागावर काम करण्यात असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम बसला.

परंतु सूत्रांच्या माहितीनुसार बोनी कपूर हे 'मिस्टर इंडिया' हा सिनेमा रिबूट करत असून या सिनेमाची एक फ्रॅन्चायझी बनवण्याच्या विचारात आहेत. ''नवीन पिढीला डोळ्यासमोर ठेऊन या सिनेमात काही बदल करण्यात येणार आहेत'', असं वक्तव्य बोनी कपूर यांनी याबाबतीत केलं. सध्या बोनी कपूर या सिनेमाच्या कथेवर काम करत असून या सिनेमाबाबत आणखी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शेखर कपूर या सिनेमाचे भाग आहेत का, हा प्रश्न बोनी कपूर यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले,''शेखर जर मोकळे असतील तर ते या सिनेमाला दिग्दर्शित करू शकतात. या नव्या सिनेमाची कथा वगैरे प्रक्रियेत शेखर सुरुवातीपासून जोडले जाण्याची शक्यता आहे.'' असा खुलासा बोनी कपूर यांनी केला.

या आगामी सिनेमात कोणते कलाकार काम करणार हे अजून निश्चित नसलं तरी हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive