By  
on  

Exclusive: कॅमिओ नाही तर 'मिशन मंगल'मध्ये विशेष भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

येत्या काही दिवसांमध्ये अभिनेता अक्षय कुमार हा 'मिशन मंगल' या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सिनेमात अक्षयची २० मिनिटांची भूमिका असल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली होती.

परंतु या बातमीला अक्षय कुमारने नकार दिला असून अक्षय या सिनेमात पूर्ण लांबीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मिशन मंगल' हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओ यांची निर्मिती असून आर बल्की हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.  हा सिनेमा २०१४ च्या मंगळयान मोहिमेवर आधारित आहे.

या सिनेमात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार फॉक्स स्टार स्टुडिओने या सिनेमासाठी अक्षयला एका विशेष भूमिकेसाठी करारबद्ध केलं आहे. मंगळयान महिमेमागे महिलांची भूमिका काय होती याला केंद्रस्थानी ठेऊन या सिनेमाची पटकथा लिहिण्यात आली आहे. स्वातंत्रदिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive