By  
on  

Exclusive: राघव लॉरेंसला पुन्हा मिळणार 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा दिग्दर्शित करण्याची संधी

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस यांनी सिनेमा अचानक सोडल्याच्या वृत्ताने सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. या सिनेमाचा एक पोस्टर समाजमाध्यमांवर त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून सिनेमा दिग्दर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा ज्या सिनेमाचा रिमेक तो कंचना ३ हा मूळ सिनेमा सुद्धा राघव लॉरेंस यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनी नुकतंच बॉलीवूड निर्माती शबीना खान आणि तुषार कपूर विषयी आपला राग व्यक्त केला होता. परंतु आता थंड डोक्याने विचार केल्यानंतर राघव यांनी आपल्या वागण्याबद्दल वाईट वाटलं आहे.

राघव हे पुन्हा मुंबईत आले असून त्यांनी दोन दिवसांपासून या सिनेमाच्या निर्मात्या शबीना खान यांच्याशी या सिनेमासंबंधी बोलणी सुरु केली आहे. त्यांनी शबीना खान यांच्यासमोर आपण व्यक्त केलेल्या रागाबद्दल आणि चुकांबद्दल माफी मागितली आणि दिग्दर्शन न करण्यामागचं खरं कारण मोकळेपणाने त्यांच्याशी शेयर केलं. त्यानंतर या दोघांमध्ये एक करार झाला असून हा सिनेमा दिग्दर्शन करण्याविषयी राघव यांनी एक अॅग्रीमेन्ट साइन केलं आहे.

पिपिंगमुनला सूत्रांच्या मते,''राघव हे या सिनेमाचं शूटिंग लवकरच पुन्हा सुरु करणार आहेत. परंतु राघव यांच्या येण्याने काही लोकं खुश नाही आहेत.''

'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात अक्षय कुमार तृतीयपंथीयाची भूमिका साकारत असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive