By  
on  

हृतिकच्या कसदार अभिनयशैलीचं दर्शन घडवणारा सिनेमा ‘सुपर 30’

या सिनेमाच्या निमित्ताने हृतिक पहिल्यांदाच बायोपिक साकारत आहे. या सिनेमात तो पटनामधील गणिततज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या हटके पोस्टरमुळे त्याची उत्सुकता अधिक वाढली होती. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हृतिकचा एकदम वेगळा लूक दिसत आहे. मुळचा गौरवणीय हृतिक या सिनेमात काहीसा सावळा दिसत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत रहात असलेल्या पण हुशार असलेल्या मुलांना शिक्षणाचे नवे मार्ग आनंद कुमार यांनी खुले केले आहेत. त्या ३० मुलांची आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या शिक्षकाची कथा या सिनेमात मांडली आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. पन ‘मीटू’ प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्याने त्याने या सिनेमापासून लांब राहणंच पसंत केलं होतं. पण या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये त्यांना क्रेडिट देण्यात आलं आहे. या सिनेमाच्या लास्ट शेड्युलचं दिग्दर्शन अनुराग बासूने केलं होतं. पण अनुरागने क्रेडिट घेण्यास नकार दिला. हा सिनेमा १२ जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive