By  
on  

सोनाली कुलकर्णीने ‘भारत’च्या टीमला दिल्या अशा खास अंदाजात शुभेच्छा

सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने भारतच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कतरिना कैफ आणि कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘ऑल द बेस्ट मॅडम सर’, चिअर्स वैभवी, लव्ह’.

सोनाली भारत सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा तिचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. यापुर्वी ती ‘दिल चाहता है’ या सिनेमातून रसिकांच्या समोर आली आहे. सोनालीने आजपर्यंत कन्नड, गुजराती, मराठी, तामिळ अशा अनेक भाषांमध्ये अभिनयाचा जलवा दाखवला आहे. सोनाली अनेक फॅशन शोमध्येही हजेरी लावत असते. यावेळी तिच्या लूक्सना फॅन्सकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. अलीकडेच तिने स्वत:चं पाक कौशल्य आजमावलं होतं. त्याचे फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive