By  
on  

अक्षय कुमार पुन्हा होणार 'रावडी', अक्षय-सोनाक्षीच्या 'रावडी राठोड'चा येतोय सिक्वेल

अक्षय कुमार आणि प्रभुदेवा २०१२ मध्ये 'रावडी राठोड' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यश संपादन केलं. आता एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार बातमीनुसार 'रावडी राठोड 2' निमित्ताने अक्षय आणि प्रभुदेवा सात वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहेत.

संजय लीला भन्साळी यांच्यासोबत शबीना खान यांनी रावडी राठोड या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी याबाबत बोलताना म्हटलं,''सध्या रावडी राठोड 2 च्या पटकथेवर काम सुरु आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.''

अक्षय कुमार सध्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत निर्माते म्हणाले,''टॉयलेट: एक प्रेम कथा सिनेमा असो अथवा पॅडमॅन. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलकीफुलकी असते. अक्षय कुमार आज बॉलीवूडमधील एक ऑलराउंडर अभिनेता आहे.''

या नव्या सिनेमाशी संबंधित अधिक माहिती मिळू शकली नसली तरी तरी पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'रावडी राठोड' सिनेमाच्या पहिल्या भागात अक्षय कुमारने इंस्पेक्टर विक्रम सिंह राठोड आणि शिव नावाच्या एका चोराची,असा डबल रोल साकारला होता. हा सिनेमा २००६ साली एस राजामौली यांच्या सिनेमाचा अधिकृत रिमेक होता.

Recommended

PeepingMoon Exclusive