'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा हा गोल्डन साडीमधला बोल्ड अंदाज एकदा पहाच

By  
on  

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलीवूडपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आज प्रियांका ही आंतरराष्ट्रीय अभिनेत्री आहे. आपल्या वेगळ्या अंदाजामुळे प्रियंका नेहमीच चर्चेत असते.

नुकतंच प्रियंकाने एका ग्लोबल मॅगझीनसाठी फोटोशूट केलं असून तिचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. याच फोटोशूट दरम्यानचा प्रियंकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

या वायरल व्हिडिओमध्ये प्रियांका सुंदर तसेच काहीश्या बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. या व्हिडिओत प्रियंकाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. थोडासा बोल्ड मेकअप करून प्रियंकाने तिचे केस तिने मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत असून हि 'देसी गर्ल' एका गाण्यावर ठुमके करताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share