महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ’ सिनेमाकडे आजही एक उत्तम कालाकृती म्हणून पाहिलं जातं. या सिनेमात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आज़मी यांच्या भूमिका होत्या. निर्माते शरतचंद्र हे या सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचं समोर आलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती या सिनेमाच्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. रेवतीने या सिनेमाचं कास्टींग सुरु केलं आहे. एका प्रसिद्ध दैनिकाच्या माहितीनुसार या रिमेकमध्ये काम करण्याची ऑफर जॅकलीन फर्नांडिसला मिळाली आहे. तिला या सिनेमाची संकल्पना आणि व्यक्तिरेखा दोन्ही आवडल्याचं समजत आहे. जॅकलीनने अजून हा सिनेमा साईन केला नसला तरी या रिमेकचा भाग व्हायची तिची अतीव इच्छा असल्याचं समजतं.
एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअरवर आधारित असललेला हा सिनेमा महेश भट्ट-परवीन बाबी यांच्या अफेअरवर आधारित असल्याचं बोललं जातं. यामध्ये स्मिता पाटील यांनी एका अभिनेत्रीची तर शबाना आझमी यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली होती.