By  
on  

सोनम कपूरच्या वाढदिवशी पती आनंद अहुजा आणि बहीण रिया कपूरने तिला दिल्या अशा हटके शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूरचा आज ९ जून रोजी ३४ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस ती आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. सोनमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिचा पती आनंद अहुजा याने तिला खास आणि रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आनंदने सोनम कपूरसोबत लग्नातला एक फोटो शेयर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#girlfriendforever #everydayphenomenal ... Happy Birthday to my .

A post shared by anand s ahuja (@anandahuja) on

आनंद सोशल मीडियावरून सोनमसाठी नेहमी रोमँटिक पोस्ट लिहीत असतो. त्यामुळे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदने सोनमसाठी  ‘गर्लफ्रेंड फॉरएवर, हैप्पी बर्थ डे माय वर्ल्ड.’ अशी पोस्ट लिहून सोनमला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

याचबरोबर सोनमची छोटी बहीण रिया कपूरने सुद्धा सोनमसोबतचा एक फोटो पोस्ट करून 'माझ्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी तुझयाशिवाय नाही जगू शकत' अशी भावनिक पोस्ट लिहून आपल्या ताईप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday sister, better half, muse, best friend. Can’t live without you ️

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor) on

सोनमचे वडील आणि दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी सुद्धा आपल्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेयर केला आहे. 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तु माझी मुलगी आहेस याचा मला अभिमान आहे. तु एक चांगली व्यक्ती सुद्धा आहेस. तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद!' अशी पोस्ट अनिल कपूर यांनी आपल्या लाडक्या मुलीसाठी लिहिली आहे. 

सध्या सोनम कपूर अभिषेक शर्मा यांच्या 'द झोया फॅक्टर' या सिनेमात अभिनय करत आहे. २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive